Ad will apear here
Next
मूकबधिर शाळेला सामूहिक श्रवण यंत्र भेट
बाभूळगाव (पंढरपूर) : येथील श्री नागनाथ मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थांना सुप्रभात ग्रुपच्या सदस्यांनी सामुहिक श्रवण यंत्र भेट दिले. त्याप्रसगी चित्रसेन पात्रूटकर, किशोर महामुनी, पोपट भोसले, जनार्थन काकडे, बाळासाहेब भोसले, मधूकर गुंजाळ, डॅ. हनुमंत खपसोलापूर : मूकबधिर विद्यार्थ्यांना वाचासिद्धीसाठी रोपळे (पंढरपूर) येथील सुप्रभात ग्रुपतर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सामूहिक श्रवण यंत्र भेट दिले.
 
येथील सुप्रभात ग्रुपतर्फे नेहमीच विधायक कामाला प्राधान्य दिले जाते. बाभूळगावातील मूकबधिर विद्यालयाला सामूहिक श्रवण यंत्राची गरज होती. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून शिक्षकांकडून प्रयत्न केले जात आहेत; मात्र या प्रयत्नांना यश मिळत नव्हते. रोपळेतील सुप्रभात ग्रुपच्या सदस्यांना विद्यालयाची या यंत्राची गरज असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी स्वतः आर्थिक भार उचलून हे यंत्र खरेदी केले.

याकामी निवृत्त कृषी पर्यवेक्षक मधुकर गुंजाळ यांनी पुढाकार घेतला. त्यांना सुप्रभात ग्रुपचे अध्यक्ष नागनाथ माळी, मोहन काळे, दादा कदम, डॉ. महावीर शहा, डॉ. हनुमंत खपाले, पोपट भोसले, दत्तात्रय भोसले, बाळासाहेब भोसले, किशोर महामुनी, जनार्धन काकडे, संजय कुलकर्णी यांनी साथ दिली.

‘या सामूहिक श्रवण यंत्रामुळे मूकबधिर विद्यार्थांना वर्गात शिकवताना ऐकू येण्यास मदत होणार आहे. ऐकू येणारी मुले हळू-हळू बोलायलाही शिकतील,’ असा विश्वास मुख्याध्यापक चित्रसेन पाथरूट यांनी सांगितले.

या श्रवण यंत्राचे उद्घाटन जनार्धन काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी तानाजी कुंभार, मधुकर भोसले, अर्जुन नंदूरे, महादेव खरसडे, सुनील गुज्जलवार आदींनी प्रयत्न केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/VZODBK
 धन्यवाद ! बाईटस ऑफ इंडिया टीम
प्रेरणा देणारी बातमी आहे1
 अतिशय सुंदर बातमी सर्व कर्मचारी यांचे उत्साह वाढवणारी आहे. धन्यवाद
 Congratulations sir for all stops
 खुप खुप धन्यवाद आमच्या विद्यार्थांचे व शिक्षकांचे कौतुक केल्याबद्दल1
 खुप खुप धन्यवाद आमच्या विद्यार्थांचे व शिक्षकांचे कौतुक केल्याबद्दल
 Thanks a lot of bytes of India
Similar Posts
प्रजासत्ताक दिनी शाळेला संगणक भेट सोलापूर : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून पंढरपूर तालुक्यातील तारापूर येथील बालगणेश बहुद्देशीय संस्थेतर्फे जिल्हा परिषद शाळेला संगणक भेट दिला.
पंढरपूरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सोलापूर : जिल्ह्यात ठिकठिकाणी ७०वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही प्रजासत्ताक दिन उत्साहात झाला. या वेळी पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गाणी व विविध कवायती सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली.
साडेतीन हजार पुस्तके भेट देणारा माणूस पंढरपूर : सावळ्या विठूरायाच्या पंढरीत विठूरायाच्या भक्तीने वेडी झालेली अनेक माणसे येत असतात. असाच एक वेडा माणूस पंढरपुरात आहे; पण त्याचे वेड जरा वेगळे आहे. ते वेड आहे लोकांना पुस्तके भेट देण्याचे. आजपर्यंत विविध प्रसंगांच्या निमित्ताने या माणसाने जवळपास साडेतीन ते चार हजार पुस्तके लोकांना भेट दिली आहेत
गांधी विचार परीक्षेचा निकाल जाहीर सोलापूर : जळगाव येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे घेतलेल्या गांधी विचार संस्कार परीक्षेचा जिल्हास्तरीय निकाल जाहीर झाला असून, यात रोपळे (ता. पंढरपूर) येथील पाटील विद्यालयातील दहावीची विद्यार्थिनी चैताली धोंडीराम भोसले हिने या परिक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language